Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 19 नवीन कोरोना बाधित तर 35 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, 22 डिसेंबर: जिल्हयात नव्याने 19 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच 35 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8833 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8444 वर पोहचली. तसेच सद्या 291 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 98 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज नवीन एका मृत्यूमध्ये कुरखेडा तालुका रा. गुरनोली येथील 80 वर्षीय महिला एचटीएन आणि मधुमेहाने पीडित होती. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.60 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.29 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.

नवीन 19 बाधितांमध्ये गडचिरोली 8, अहेरी 4, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 2, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 1, सिरोंचा 0 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 35 रूग्णांमध्ये गडचिरोली 16, अहेरी 9, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 3, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 1, कोरची 1, कुरखेडा 1 व वडसा मधील 3 जणांंचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील पोलिस स्टेशन पोटेगाव 1, भगवती राईस मिल 2, कोटगल 1, वनश्री कॉलनी 1, आशिर्वादनगर 1, आरमोरी रोड 2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सीआरपीएफ 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये लखमापुर बोरी 1, ईल्लुर 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विवेकानंदपुर 1, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये एकरपूर 1, शिवाजी वार्ड 1, राजेंद्र वार्ड 2, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.

Comments are closed.