Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपुर जिल्ह्यात आज दोन रुग्णांचा मृत्यूसह 73 कोरोनामुक्त तर 54 नव्याने पॉझिटिव्ह

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • आतापर्यंत 1,81,384 नमुन्यांची तपासणी
  • उपचार घेत असलेले बाधित 335

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर, दि. 6 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 73 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 54 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 520 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 810 झाली आहे. सध्या 335 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 81 हजार 384 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 56 हजार 538 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील तुकूम येथील 48 वर्षीय पुरूष व गोकुलगली बाजार वार्ड येथील 64 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 375 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 342, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 11, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 54 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 25, चंद्रपूर तालुका दोन, बल्लारपुर एक, भद्रावती पाच, ब्रम्हपुरी एक, राजुरा चार, चिमुर सहा, वरोरा सात, कोरपना दोन व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.