Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोनसरी ते चांदागड डांबरीकरण रोडची दुरावस्था

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा, दि. ०८ जानेवारी: कुरखेडा तालुक्यातील सोनसरी चांदागड ६ किलोमीटर डांबरीकरण रोडची दुरावस्था झाली असून पुर्णपणे रोडवरचा डांबर गायब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या रोडवरून प्रवास करतांना जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वारंंवार बांधकाम विभागाला निवेदने देवून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करित असल्याचे नागरिकांंकडुन बोलल्या जात आहे. या रोडवरून प्रवास करतांंना अनेकदा अपघात झाले असून अनेकजण किरकोळ जख्मी झाले आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोनसरी व चांदागड येथिल नागरिक तालुका स्तरावर अनेक कामांकरिता दररोज येणे-जाणे करित असतांंना त्यांना या रोडवरून प्रवास करतांंना जिव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सोबतच या गावांतील नागरिकांना पाठीचा व गुडघ्याचा आजार जाणवत आहे. करिता संबंधित विभागाने रोडची दुरुस्ती करावी अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात येहील असा इशारा देण्यात आला आहे.

Comments are closed.