Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुक्तीपथ: २० रुग्णांवर तालुका क्लिनिकमध्ये उपचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : मुक्तीपथ अभियानाच्या वतीने  एटापल्ली , मुलचेरा तालुका कार्यालयात गुरुवारी व्यसन उपचार तालुका क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. या  क्लिनिकला एकूण २० रुग्णांनी भेट देऊन पूर्ण उपचार घेत दारू सोडण्याचा निर्धार केला आहे.

मुलचेरा शहरातील गोंडवाना चौकातील जिप शाळेजवळीत मुक्तीपथ तालुका कार्यालयात व एटापल्ली शहरातील आनंद नगरातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात दर गुरुवारी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. दोन्ही क्लिनीकच्या माध्यमातून एकूण २० रुग्णांवर उपचार करण्यात आले. यावेळी रुग्णांना मार्गदर्शन देखील करण्यात आले. दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे आणि तो उपचाराने बरा होतो. दारूची सवय सोडण्यासाठी तसेच यातून उद्भवणारा त्रास कमी करण्यासाठी उपचार घेणे आवश्यक आहे. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती देत व्यसनी रुग्णांना समुपदेशन व औषधउपचार करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.