Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नंदुरबारमधील अपघातात मरण पावलेल्या आदिवासी मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये – मुख्यमंत्री

Get real time updates directly on you device, subscribe now.

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नंदुरबार, दि. २३ जानेवारी: नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन 6 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यात 5 महिलांचा समावेश आहे. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मरण पावलेले मजूर हे आदिवासी असून अतिशय दुर्गम अशा धडगाव तालुक्यातील आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याशिवाय या अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्वांवर उपचार सुरू असून ते देखील शासनाच्या खर्चानेच करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत
आज या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्री के.सी. पाडवी तसेच जिल्हा प्रशासनाकडून याची माहिती घेत संपूर्ण मदत करण्याचा सूचना दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.