Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपालांच्या दौऱ्याची शेतकरी मोर्चाला पुर्वकल्पना दिल्याचे राजभवनाचे स्पटीकरण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २५ जानेवारी: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचेकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे व दिनांक २५ जानेवारी रोजी ते गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला  संबोध‍तीत करणार असल्याने राज्यपाल महोदय त्या दिवशी शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाहीत, असे राज भवनातून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्याचे आज राज भवनकडून स्पष्ट करण्यात आले होते.

संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे (9867693588)यांना दिंनांक २२ जानेवारी रोजी दुरध्वनी व्दारे तसेच निमंत्रक प्रकाश रेडडी यांना दिनांक २४ जानेवारी रोजी लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या  अनुपलब्धते बददल कळविण्यात आले होते. धनजंय शिंदे यांनी व्हॉटसॲप संदेशाव्दारे निरोप  मिळयाल्याचे मान्य केले होते. तसेच प्रकाश रेडडी यांना या बाबतचे लेखी पत्र दिनांक २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यामुळे राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही हे वृत्त चुकीचे आहे असे राज भवनातून स्पष्ट करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून दिनांक २५ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता निवेदन स्विकारतील असे देखिल धंनजय शिंदे यांना पुर्वीच कळविण्यात आले होते व तसे स्विकृत असल्याबददल त्यांनी संदेशाव्दारे कळविले होते. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.