Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी : माओवाद्याचं माहेरघर असलेल्या कमलापूर येथील ग्रामपंचायत जवळ आढळली नक्षल पत्रके

Get real time updates directly on you device, subscribe now.

पत्रकातून कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवन्याचे केले आवाहन.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क:

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी 10 फेब्रुवारी:- आज सकाळच्या सुमारास माओवादी चळवळीचं माहेरघर  असलेल्या कमलापूर येथील ग्रामपंचायत जवळील रस्त्यावर छापील नक्षल पत्रके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ह्या पत्रकाच्या माध्यमातून माओवाद्यानी मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात कायदे रद्द होईपर्यत संघर्ष सुरू ठेवन्याचे आवाहन केले आहे. भारतीय कम्यूनिस्ट पार्टी  केंद्रीय कमिटी प्रवक्ता अभय असे नाव या छापील पत्रकावर नमूद आहे.

ह्या पत्रकाच्या माध्यमातून माओवाद्यानी मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात कायदे रद्द होईपर्यत संघर्ष सुरू ठेवन्याचे आवाहन केले आहे. भारतीय कम्यूनिस्ट पार्टी केंद्रीय कमिटी प्रवक्ता अभय असे नाव या छापील पत्रकावर नमूद आहे.
ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान माओवादी हिंसाचार करू न शकल्यामुळे आता 15 फेब्रुवारी ला होऊ घातलेल्या सरपंच/उपसरपंच पदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माओवादी कोणतं पाऊल उचलतात याकडे लक्ष लागलं आहे. त्यासोबत माओवाद्याचं  अस्तीत्व दाखविण्याच प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.