Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुख्यात डॉन अरुण गवळी कोरोनाची लागण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर 11 फेब्रुवारी :- कुख्यात डॉन अरुण गवळी याच्यासह पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तो सध्या नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे. एकाच वेळी पाच कैद्यांना कोरोना झाल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. सर्वांना कारागृहातच विलगणीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी अरुण गवळी याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे गवळी याच्यासह अन्य कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आज आला. यात अरुण गवळीसह पाच जणांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या पाचही जणांचे विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या पाचही जणांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे देण्यात येणार आहेत. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये कुख्यात शेखूचाही समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.