Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जनावरांच्या तोंडखुरी-पायखुरी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. १६ डिसेंबर :  जिल्हयातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गाय,बैल,म्हैस यासारखे पशुधन असुन अनेक शेतकरी पशुपालन व्यवसाय करीत आहेत. त्या पशुपालंकाच्या पशुधनास तोंडखुरी-पायखुरी सारख्या संसर्गजन्य रोगापासून मुक्त ठेवण्याकरीता राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण अभियाना अंतर्गत गडचिरोली जिल्हयाकरीता ८००० तोंडखुरी-पायखुरी लस मात्रा पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या आहेत. व त्यांचे वाटप जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय संस्थाना करण्यात आलेले आहे.

लसीकरणाला सोमवार पासुन जिल्हयात सुरुवात झालेली आहे. तोंडखुरी-पायखुरी रोगामुळे पशुपालकांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत असते. ते टाळण्यासाठी पशुपालकांनी स्वयंस्फुर्तीने आपल्या जनावरांना लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. सदर लसीकरण मोहिमे करीता शासनाकडुन यांनतरही लसपुरवठा टप्प्या टप्प्याने करण्यात येणार आहे. तरी सदर लसीकरण मोहिमेत नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधून आपल्या जनावरांना १००% लसीकरण करुन घेण्यात यावे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तोंडखुरी-पायखुरी रोगामध्ये बाधीत जनावराना पुढील प्रमाणे लक्षणे दिसुन येतात:-

जनावरांच्या तोंडातुन लाळ गळणे,तोंडामध्ये व पायांच्या खुरांमध्ये व्रण येणे, जनावर अशक्त होणे,जनावरांची भुक मंदावने,तोंडामध्ये आणि जिभेवर चट्टा पडणे,खुरांमध्ये जखमा होऊ जनावर लंगडने, हि लक्षणे आढळून येतात. तरी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , गडचिरोली डॉ.विलास गाडगे यांनी केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  : 

गडचिरोली जिल्हयात शंभर टक्के कोरोना लसीकरणासाठी “हर घर दस्तक” मोहिम – जिल्हाधिकारी संजय मीना

कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांचे मालमत्ता विषयक हक्क,संरक्षित करण्याच्या अनुषंगाने कार्यपध्दती निश्चित – महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

आजपासून दोन दिवस सरकारी बँक कर्मचारी संपावर; काम प्रभावित होणार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.