Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 17ऑगस्ट:जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्या वतीने दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी शनिवारला  आभासी तंत्रज्ञान व प्रत्यक्षरित्या राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे .जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र व प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे सचिव श्री. डी. डी. फुलझेले यांनी केले आहे.

       राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय.ॲक्ट प्रकरणे, भु-संपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारांना आपली बाजु मांडण्याची संधी मिळणार असून दोन्ही पक्षकारांना मान्य असलेली तडजोड पक्षकारांच्या आपसी सहमतीने होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये झालेल्या न्याय निवाडयाचे, तडजोडीचे समाधान दोन्ही पक्षकारांना होत असते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व पक्षकार, अधिवक्ता आणि न्यायालयातील कर्मचारी व पॅनल सदस्य यांचे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन व्हॉट्सअॅप व आभासी तंत्रज्ञानाद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे) संबंधीत पक्षकारांची ओळख आधीच निश्चित करून लोकन्यायालयाच्या दिवशी तडजोडीमधील अटी व शर्ती नोंदविता येण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे असे सचिव श्री. डी. डी. फुलझेले यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज 1 कोरोना बाधित तर कोरोनामुक्त नाही

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

अखेर… खाजगी शाळांच्या १५ टक्के फी कपात पालकांना मोठा दिलासा

 

जन्मदिवशी आईला हेलिकॉप्टरमधून मुलांनी घडविली सैर !

Comments are closed.