खोपोलीतील अपघात स्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
ब्लॅक स्पॉट शोधून उपाय योजना करण्याच्या सूचना
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
मुंबई, 15 एप्रिल : मुंबई पुणे महामार्गावर आज पहाटे खाजगी बसला झालेल्या अपघातात १३ जणांना आपला जीव गमावावा लागला तर २९ जण जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आज अपघात स्थळी भेट देवून अपघात कसा झाला याची माहिती घेतली. बचाव कार्यात भाग घेणाऱ्या सर्व यंत्रणा तसेच स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी कौतुक केले. तत्पूर्वी त्यांनी एमजी एम रुग्णालयाला भेट देवून जखमींची विचारपूस केली तसेच मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. साधारणपणे असे अपघात पहाटेच्या सुमारास होतात.यांदर्भात आपण ३ बैठका घेतल्या होत्या. महामार्गावरील ब्लॅक स्पॉट शोधून तेथे उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत दिली जाईल तसेच जखमींवर सर्व ते उपचार करण्या बाबत संबंधितांना सूचना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा :-


Comments are closed.