Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! पोलीस हवालदाराची गळफास घेत आत्महत्या! 

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील घटना...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोंदिया, दि. २७ ऑगस्ट : गोंदिया जिल्ह्यातून आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस हवालदाराने आपल्या राहत्या घराच्या वरांड्यात स्वत:लाच गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी येथे घडली आहे.

महेश भुरे असे मृत पोलिसांचे नाव असून ते देवरी पोलीस उप मुख्यालयात कार्यरत होते. संबंधित घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता महत्त्वाची माहिती समोर आली. पोलीस हवालदार महेश भुरे हे गेल्या तीन वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांना असह्य त्रास सोसावा लागत होता. अखेर हा त्रास सोसावत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेची नोंद देवरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी देवरी पोलीस तपास करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

धक्कादायक!! सणासुदीच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू!

रेल्वे स्थानकातील लिफ्टमध्ये प्रवासी अटकले…प्रवाशांवर श्वास कोंडल्याने गुदमरून जाण्याची वेळ…

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.