Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विवाहीत महीलेचा विनयभंग करून केली मारहाण!

महिलेचा पती नसतांना मारहाण करून केला विनयभंग एव्हडेच नव्हे तर महीलेच्या कापड दुकानाला लावली आग. गोंदियालगत असलेल्या गोविंदूपरच्या आंबेडकर चौकातील धक्कादायक घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंदिया :  दोन महिन्याच्या जुन्या वादावरून आरोपीने विवाहीत महिलेच्या घरात शिरून विनयभंग करून मारहाण केली. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे श्वानावरून झालेल्या वादात विवाहीत महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत तिला मारहाण करण्यात आली.  इतकेच नव्हे तर महिलेच्या पतीच्या कापड दुकानाला आग लावल्याची खळबळजनक घटना गोंदिया शहरातील गोंविंदपूरच्या आँबेडकर चौकात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या कुत्रा पीडित महिलेच्या मुलीला चावा घेतल्याने महिलेने आरोपीला हटकले होते, याच कारणावरून पीडित महिला व आरोपित भांडण झाले होते. तर तब्बल दोन महिन्याचा राग म्हणत धरत आरोपीने १० तारखेच्या मध्यरात्री महिला आपल्या घरी एकटी असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला मारहाण करायला सुरूवात केली. त्या महिलेने आरडाओरड केल्यामुळे पती मदतीसाठी धाऊन आला. त्यानंतर आरोपी व पीडित महिलेच्या पती मध्ये मारपीट झाली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या पतीच्या कापड दुकानाला आग लावली. यामुळे पीडित महिला व तिच्या पतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रकरणी पोलीसांनी आरोपी ऋतिक विजय मेश्राम याला अटक केली असली तरी पोलीस आरोपीची पाठराखण करीत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध  गोंदिया शहरात पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४, ४५२, ४३६, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून आरोपीला जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

७ वर्षीय चिमुकलीवर ५४ वर्षीय म्हाताऱ्यांने केला अत्याचार!

क्रिकेटपटू रोहित शर्मा झाला अलिबागकर

अधीक्षक अभियंता पुंडलीक थोटवे यांना स्वयंदीप सन्मान जीवन गौरव पुरस्कार प्रदान

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.