Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रियसीने प्रियकरावर झाडली बंदुकीची गोळी!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था, १८ डिसेंबर:  पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कटवा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या केसिया गावात बुधवारी दि. १५ डिसेंबर २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास प्रियसीने प्रियकरावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला बंदुकीसह अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रीयसीने तरुणाला मिठी मारली, त्याचं किस घेतलं. दोघांनी मिळून सिगारेट ओढली आणि अचानक तिनं तरुणाकडे बंदूक दाखवली आणि त्याच्यावर गोळी झाडली. मात्र, ही गोळी तरुणाला स्पर्श करुन निघून गेली. त्यामुळे त्याचा जीव वाचला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या घटनेनंतर आरोपी तरुणीनं तरुणाला सोडून घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर तरुणानं गोंधळ घातला आणि आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले आणि पीडित तरुणानं गावालगत असलेला पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली.

पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत जखमी तरुणानं सांगितलं की, त्याची प्रियसी (Girlfriend) नुकतीच तिचं घर झारखंड येथून परतली होती. ही तरुणी काही महिन्यांपूर्वी तेथे नोकरीसाठी गेली होती. परतल्यानंतर तरुणीनं त्याला स्थानिक सर्कस मैदानावर येण्यास सांगितलं. त्यानंतर सदर प्रकार घडला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. तिनं तरुणावर गोळीबार केलेली बंदूकही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमधील दुरावा वाढला होता, त्यामुळे रागाच्या भरात तरुणीनं बॉयफ्रेंडवर गोळ्या झाडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, त्यानंतरच या प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

हे देखील वाचा :

अवैधरित्या मुरूम उत्खनन करतांना दोन पोक्लेन जप्त; आलापल्ली वन विभागात उपवनसंरक्षकाची कारवाई

वाघाच्या हल्यात महिलेच्या मृत्यू

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमधील नामाप्रच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात Omicron चा कहर

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.