Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमधील नामाप्रच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. १७ डिसेंबर: राज्य निवडणूक आयोग,  महाराष्ट्र, मुंबई यांचे आदेशान्वये दिनांक १५ डिसेंबर २०२१ रोजीचे निर्णयान्वये ना.मा.प्र. च्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोट निवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम गडचिरोली जिल्हयात पुढील प्रमाणे राबविण्यात येत आहे.

निवडणूकीचे टप्पे व दिनांक :-  ज्या ठिकाणी सोडत काढणे आवश्यक आहे तिथे सोडतीकरीता ग्रामसभेची सुचना देण्याचा दिनांक १८ डिसेंबर २०२१, (शनिवार),विशेष ग्रामसभेमध्ये आवश्यकतेनुसार सर्वसाधारण जागा निश्र्चित करण्यासाठी सोडतीची दिनांक २० डिसेंबर २०२१, (सोमवार), नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसुचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसुचनेमध्ये सुधारणा करुन त्याबाबत योग्य ती सुचना व प्रसिध्दी देण्याचा दिनांक २० डिसेंबर २०२१, (सोमवार), तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक २० डिसेंबर २०२१, (सोमवार), नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी) दिनांक २८ डिसेंबर २०२१, (मंगळवार) ते दिनांक ३ जानेवारी २०२२, (सोमवार), वेळ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० ( दिनांक १  जानेवारी २०२२, (शनिवार), व दिनांक २ जानेवारी २०२२ चा रविवार वगळून) नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी) दिनांक ४ जानेवारी २०२२, (मंगळवार), वेळ स.११.०० वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (संबधित तहसिल कार्यालयाचे ठिकाणी) दिनांक ६ जानेवारी २०२२ (गुरुवार) दुपारी ३.०० वाजेपर्यत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ ६ जानेवारी २०२२, (गुरुवार) दुपारी ३.००  वाजेपर्यंत. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक १८ जानेवारी २०२२ (मंगळवार) (गडचिरोली जिल्हासांठी स. ७.३० वा. पासून ते दुपारी ३.०० वा. पर्यंत, मतमोजणीचा असल्यास मतदानाचा दिनांक १९ जानेवारी २०२२, (बुधवार) तरी वरील प्रमाणे निवडणूकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

गोंदिया ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ओबीसींना त्यांचे हक्क मिळेल – प्रफुल पटेल

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ताडोबाच्या नंदनवनात पुन्हा एकदा ब्लॅक ब्यूटीचे दर्शन

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

 

 

Comments are closed.