Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओबीसी समाजानी निवडणुकीवर बहिष्कार न करता भाजपाला मतदान करू नये – मंत्री छगन भुजबळ

एम्परिकल डाटा गोपीनाथ मुंडे यांनीच जमा केलं असा अनेक भाषणात पंकज मुंडे बोलल्या आहेत –मंत्री छगन भुजबळ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भंडारा, दि. १७ डिसेंबर : गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे भंडारा जिल्ह्यात प्रचारासाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ओबीसी समाजावर अन्याय हा भाजपा करत आहे. एम्परिकल डाटा भाजप सरकारनी वेळेवर कोर्टात जमा केला नाही.

त्यामुळे आज ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. ओबीसी समाजानी मतदानावर बहिष्कार करून पुन्हा भाजपाला संधी देण्यापेक्षा ओबीसी समाजानी भाजपाला मतदान करू नये. असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारचे मत्री हतबल झाले. असा ट्विट केला असताना त्याला प्रतिउत्तर देत भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधत बोलले की, गोपीनाथ मुंडे यांनीच एम्पिरीकल डाटा जमा केला तेव्हाच ओबीसींची जनगणना झाली.  असं पंकजा मुंडे यांनी अनेक भाषणात उल्लेख केला आहे.  तर आता त्याच महाविकास आघाडी सरकारवर का निशाणा साधत आहे. असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

हे देखील वाचा : 

गोंदिया ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ओबीसींना त्यांचे हक्क मिळेल – प्रफुल पटेल

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमधील नामाप्रच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

 

Comments are closed.