Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न केल्यामुळे वैधमापन शास्त्र विभागाची तीन ठिकाणी कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. १७ डिसेंबर : वैधमापन शास्त्र नागपूर विभागाचे सहनियंत्रक बिरादार, उपनियंत्रक चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे ह.तु.बोकडे यांच्या मार्गदर्शनात  गडचिरोली विभागाचे वैधमापनशास्त्र अधिकारी रूपचंद फुलझेले यांनी दिनांक १७ डिसेंबर रोजी धानोरा येथे विविध ३ ठिकाणी कारवाई केली.

वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न करता वजन वापर केल्या बाबत नियम १२/२३ नुसार धान खरेदी केंद्रावर तपासणी करून संबंधित तीन ठिकाणी केंद्रावर १२/२३ नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये विनोद निकुरे, दूधमाळा, धानोरा, आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, दुधमाळा, धानोरा, विलास एचपी गॅस ग्रामीण वितरक धानोरा यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे रूपचंद फुलझेले वैधमापनशास्त्र अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

गोंदिया ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ओबीसींना त्यांचे हक्क मिळेल – प्रफुल पटेल

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमधील नामाप्रच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम

ओबीसी समाजानी निवडणुकीवर बहिष्कार न करता भाजपाला मतदान करू नये – मंत्री छगन भुजबळ

 

Comments are closed.