Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंदिया ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ओबीसींना त्यांचे हक्क मिळेल – प्रफुल पटेल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंदिया, दि. १७ डिसेंबर : भंडारा, गोंदिया जिल्ह्यात  होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका २१ डिसेंबरला होत असल्याने राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात काल निर्णय घेण्यात आला की, ओबीसी ला आरक्षण मिळेल तो पर्यंत निवडणुका घेऊ नये. असा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला, मात्र अद्याप कोणताही पत्र मंत्रिमंडळाकडून निघाले नाही.

यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल म्हणाले की, सर्वोच न्यायालयाने जो आदेश दिला आला आहे. तो पाळावा लागेल आणि निवडणूक आयोग हे स्वतंत्र असते, कोणत्याही सरकारचा आधीन नसतो. म्हणून निवडणूक आयोगला सर्वच न्यायालयाचे आदेश बंधनकारक असतात. मात्र त्याच्या वर मी काही भाष्य करणार नाही, कारण हे सर्वोच न्यायालचा आदेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र महाराष्ट्राचे जे आयोग बनलेले आहे. ते आपले काम ४ ते ५ महिन्यात पूर्ण करेल कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. जेवढे पैसे लावणार तेवढे पैसे राज्य मंत्रिमंडळ उपलब्ध करून देणार एकदा ओबीसी चा डाटा उपलब्ध झाला तर पुन्हा आम्ही सर्वोच न्यायालयात जाऊ व ओबीसी समाजाला त्यांचा अधिकार मिळवूंन देऊ ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही.

अशी भूमिका राज्यसभा सदस्य तथा राष्ट्र्वादी कॉग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे. ते आज गोंदिया जिल्ह्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असतांना बोलत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात Omicron चा कहर

ताडोबाच्या नंदनवनात पुन्हा एकदा ब्लॅक ब्यूटीचे दर्शन

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

 

Comments are closed.