Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात Omicron चा कहर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, १७ डिसेंबर: कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. देशाची (National Capital, Delhi) राजधानी दिल्लीत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे १० नवीन रुग्ण आढळले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) ४० जणांचे नमुने पाठवण्यात आले होते. यामध्ये १०  जणांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग आढळून आला आहे. त्यामुळे आता देशभरात ओमायक्रॉनची लागण झालेले ९७ रुग्ण समोर आले आहेत.

आता देशात Omicron व्हेरिएंटची ९७ प्रकरणे समोर आली आहेत. तर दिल्लीत हा आकडा २० वर पोहोचला आहे. आदल्या दिवशी कोरोनाचे ८५ नवीन रुग्ण आढळून आले होते. यामध्ये सुमारे ४० लोकांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. यामध्ये ओमायक्रॉनची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. गुरुवारी सापडलेल्या बाधितांनी गेल्या चार महिन्यांचा विक्रम मोडला आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर लोकांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

ताडोबाच्या नंदनवनात पुन्हा एकदा ब्लॅक ब्यूटीचे दर्शन

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

 

 

Comments are closed.