Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक विषयक आढावा

चंद्रपूर जिल्ह्यात ऑनलाईन १३७७६ तर ऑफलाईन ५६४७४ दावे व हरकती प्राप्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर दि. १७ डिसेंबर : मतदार यादी निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे – वर्मा यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) पल्लवी घाटगे, नायब तहसीलदार सचिन पाटील आदी उपस्थित होते.

१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने १ नोव्हेंबर ते  ५ डिसेंबर २०२१ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतीबाबत आढावा घेण्यात आला. सदर कालावधीत प्राप्त दावे व हरकती हे दिनांक २० डिसेंबर २०२१ पर्यंत निकाली काढण्याबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात प्राप्त झालेल्या दावे व हरकतींची संख्या : नमुना – ६ (ऑनलाईन – ९२२९, ऑफलाईन – ३८४२७), नमुना – ७ (ऑनलाईन- ९७६, ऑफलाईन –  १०३८९), नमुना – ८ (ऑनलाईन – २५७७, ऑफलाईन – ४७३२), नमुना- ८ अ (ऑनलाईन – ९९४,  ऑफलाईन – २९२६)

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ओबीसी समाजानी निवडणुकीवर बहिष्कार न करता भाजपाला मतदान करू नये – मंत्री छगन भुजबळ

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमधील नामाप्रच्या रिक्त झालेल्या जागा सर्वसाधारण करुन पोटनिवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम

गोंदिया ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही ओबीसींना त्यांचे हक्क मिळेल – प्रफुल पटेल

 

Comments are closed.