Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैधरित्या मुरूम उत्खनन करतांना दोन पोक्लेन जप्त; आलापल्ली वन विभागात उपवनसंरक्षकाची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आलापल्ली, दि. १७ डिसेंबर : आलापल्ली वन विभागात असलेल्या पेरमिली वनपरिक्षेत्रातील मीरकल ते सकीनगट्टा रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या मुरूम उत्खनन करतांना दोन पोक्लेन जप्त केले असून त्याची किंमत १ कोटीच्या जवळपास आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अलापाल्ल्ली वन विभागात असलेल्या मीरकल ते सकीनगट्टा दरम्यान रस्त्याचे काम सुरु असून त्यासाठी लागणारी मुरूम अवैधरित्या उत्खनन करीत असल्याची गुप्त माहिती आलापल्ली वनाधिकाऱ्याना प्राप्त झाली असता सदर चौकशीसाठी उप वनसंरक्षक राहुलसिंह टोलीया व उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पेरमीली योगेश शेरेकर यांनी वनपथकासह जाऊन चौकशी केली असता, त्याठिकाणी मिरकल ते सकीनगट्टा रस्त्याचे काम सुरु असून त्याठिकाणी दोन पोक्लेनने अवैधरित्या मुरूम उत्खनन करीत असल्याचे प्रत्यक्ष आढळून आले. त्यावेळी वनाधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणी केली असता कुठलेच कागदपत्र आढळून आले नाही. सदर घटनेत जप्त करण्यात आलेल्या पोक्लेनची किंमत १ कोटीच्या जवळपास असून चौकशीअंती वनविभागाने वनगुन्हा नोंद केला आहे.

या कारवाईसाठी क्षेत्रसहाय्यक बावने, तिम्मा, अनिल झाडे, वनरक्षक अविनाश कोडापे, मेडपल्लीवार, पठान, साबळे, दामोधर चिव्हाणे, मातने, जांभुळे, कुमारी गरमळे, आत्राम आदी सहभागी झाले होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वाघाच्या हल्यात महिलेच्या मृत्यू

वार्षिक पडताळणी व मुद्रांकण न केल्यामुळे वैधमापन शास्त्र विभागाची तीन ठिकाणी कारवाई

ओबीसी समाजानी निवडणुकीवर बहिष्कार न करता भाजपाला मतदान करू नये – मंत्री छगन भुजबळ

 

 

 

Comments are closed.