Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! तांत्रिक विद्येने घेतला तरुणाचा जीव

अघोरी विद्येचा युवक ठरला बळी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. २० मे : उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर करून एका २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील विठ्ठल वार्डात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली आहे.

वर्ध्याच्या आर्वी शहरात अमरावती येथील युवक उपचारासाठी तांत्रिकाकडे (आरोपी) गेला होता. मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणावर आपण हमखास उपचार करतो अशीच बतावणी तांत्रिकाने केली होती. परंतु उपचार सुरू असताना तांत्रिकाने २२ वर्षीय युवक रितीक गणेश सोंनकुसरे, रा. अमरावती याचा गळाच दाबला. यात त्याचा मृत्यू झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

घटनेची माहिती पोलिसाना  न देताच प्रेत अमरावती येथे कुटुंबाच्या सुपूर्त करण्यात आले. आर्वीच्या विठ्ठल वॉर्डात राहणाऱ्या आरोपी तांत्रिक अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल जुंनैद अब्दुल रहीम, अब्दुल जमीर अब्दुल रहीम या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मृतकाचे प्रेत पोलिसांना कोणतीही पूर्व सूचना न देता अमरावतीला पाठविण्यात आले आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहेय. या प्रकरणी कोतवाली अमरावती पोलिसांनी मार्ग दाखल केला होता. अधिक सखोल तपास केल्यानंतर या प्रकरनाचे बिंग फुटले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

कमलापूर, पातानील येथील हत्ती कोणत्याही परिस्थितीत हलवू देणार नाही : खा. अशोक नेते

कमलापूर,पातानील येथील हत्ती हलविण्याच्या विरोधात आलापल्लीत भाजपा कार्यकत्यांनी केले चक्काजाम आंदोलन.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.