Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कमलापूर, पातानील येथील हत्ती कोणत्याही परिस्थितीत हलवू देणार नाही : खा. अशोक नेते

सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीच्या विश्राम गृहात पत्र परिषदेत दिली माहिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. २० मे : अहेरी तालुक्यातील कमलापूर व पातानील येथील ११ हत्ती गुजरात राज्यात हलविण्यात येणार असल्याची चर्चा नागरिकांत जोरात असून यामुळे स्थानिक लोकांत प्रचंड रोष असून लोकांच्या भावना या बाबतीत तीव्र असल्याने कोणत्याही परिस्थितीत येथील हत्ती हलवू देणार नाही अशी ग्वाही गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी शुक्रवारी आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात पत्रपरिषदेत माहिती दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कमलापुर आणि पातानील येथील ११ हत्ती गुजरात येथे हलविन्यात येणार आहे. असे कुठलेही पत्र वनविभाग आलापल्ली सिरोंचा कार्यालयाला प्राप्त झाले नसून फक्त ही अफवा आहे. विरोधकांना आपल्याला आडून बदनाम करण्याचा डाव आहे, असेही खा. नेते म्हणाले. हत्ती पाठविण्याचा निर्णय राज्याचा असतो त्यात केंद्राची कोणतीही भूमिका नसते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

४ महिन्या आधि असेच पेपर सोशल मीडिया मधून हत्ती हलविन्यात येणार असल्याचे प्रसारमाध्यमात बातम्या प्रसारित झाले होते. त्यावेळी निरथर्क बातम्या होत्या, पुन्हा तेच होत आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षक आलापल्ली राहुल टोलिया यांना पत्र परिषदेत समोरासमोर खा. नेते यांनी विचारणा केली असता हत्ती हलविण्यासंदर्भात कोणतेही पत्र आपल्या कार्यालयाला प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले. हत्ती हलविण्यासंदर्भात आपण केंद्रीय उपसंचालक वन्यजीव सुनील शर्मा यांचीही या प्रश्नी भेट घेऊन पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने कमलापूर व पातानील येथील हत्तींच्या सांगोपणाकडे लक्ष देण्यासाठी सोईसुविधा उपलब्ध करून द्यावा. प्रशिक्षित महावत, हत्तींच्या देखभालीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करावी एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी राज्यशासनाने जातीने लक्ष द्यावे यात खा. म्हनुन आपणही आपला वाटा नक्कीच देऊ असे ते म्हणाले. डीपीडीसी व दिशा समितीच्या माध्यमातून कमलापूर व पातानील येथील सोई सुविधा पुरविण्यासाठी व पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही खा. नेते यांनी पत्रपरिषदेत दिली.

या पत्रपरिषदेला जेष्ठ नेते बाबूराव कोहळे, संघटन महामंत्री रवी ओलालवार, आदिवासी आघाडी कार्यकारी जिल्हाध्यक्ष संदीप कोरेत, जिल्हा सचिव विनोद अकँनपल्लीवार, तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री, पोशालू सुदरी, मोहन मदने, सागर डेकाटे तर वन विभागाचे वन क्षेत्रपाल योगेश शेरेकर, वनपाल निम्रड आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : 

कमलापूर,पातानील येथील हत्ती हलविण्याच्या विरोधात आलापल्लीत भाजपा कार्यकत्यांनी केले चक्काजाम आंदोलन.

 

 

Comments are closed.