Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक!! आलापल्लीत राहत्या घरी महिलेचा आढळून आला मृतदेह!

महिलेचा पती फरार असल्याने पतीनेच निर्घृण खून केली असल्याची दाट शक्यता. अहेरी पोलिसांकडून फरार पतीचा शोध सुरु.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली: अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील वेलगुर रोड वरील वॉर्ड क्रमांक २ मधील एका राहत्या घरात आज सकाळच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळला आहे. तिच्या पतीनेच तिची हत्या केली असल्याचा संशय आहे. मृतक महिलेचा पती फरार असल्याची माहिती आहे.

मृतक महिलेचे नाव सुशीला गॊपीचंद मडावी वय ४५ वर्ष असे आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आलापल्ली येथील वेलगुर रोड वरील वॉर्ड क्रमांक. २ मध्ये भेडके यांच्या घरी मूळ भामरागड तालुक्यातील कोठी येथील गॊपीचंद मडावी (५५) आणि सुशीला गॊपीचंद मडावी (४५) हे दाम्पत्य मागील दोन महिन्यांपासून भाड्याने राहत होते. मोलमजुरी करून ते आपली गुजराण करीत होते.

आज सकाळच्या सुमारास शेजारच्या लोकांना त्या घरातून दुर्गंधी येत असल्याच्या कारणावरून आत डोकावून बघितले असता महिलेचे मृतावस्थेत शव आढळले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याबाबत ची माहिती शेजारच्या लोकांनी अहेरी पोलीस स्टेशन ला दिली. अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे आपल्या पोलीस कर्मचारी वर्गासह घटनास्थळी पोहोचुन घटनेचा पंचनामा केला. सदर घटनास्थळी अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर  ह्यांनी ही घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस कर्मचारी वर्गांना दिले आहे. पोलीस कर्मचार्यांनी घटनेचा पंचनामा करून  मृतक महिलेचे शव अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टेम साठी पाठविले आहे.

महिलेच्या खुनाचा संशय असलेल्या आरोपी पती चा शोध अहेरी पोलीस घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास आहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे व पोलीस कर्मचारी करत आहे.

हे देखील वाचा : 

लॉकडाऊन काळात राज्यातील कृषी दुकानं दिवसभर राहणार सुरु

भारतीय डाक विभागात 2428 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.