Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लॉकडाऊन काळात राज्यातील कृषी दुकानं दिवसभर राहणार सुरु

कृषी मंत्री दादा भुसे यांची माहिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

परभणी : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन बेडची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार, 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येणार आहेत. राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी खरीप हंगाम लक्षात घेता राज्यातील कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व आस्थापनं दिवसभर सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.

परभणीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृषी क्षेत्राच्या लातूर विभागीय आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत कुठेही अडचण होऊ नये याचा विचार करुन आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या व्यवस्थापनांची, ट्रॅक्टर दुरुस्तीची आणि ड्रिपची आस्थापनं चालू ठेवण्यास अनुमती देण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यावर्षी मान्सून वेळेवर असून पेरणी आणि इतर शेतीविषयक कामांसाठी या सुविधा कोविडचे सर्व नियमे पाळून सुरु ठेवण्याबाबत खबरदारी घेण्याचेही यावेळी बोलताना कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

व्यवसाय प्रशिक्षण संस्था म्हणून सहभागासाठी मुंबईतील रुग्णालये, प्रशिक्षण संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 

Comments are closed.