Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

३१ मे दिनविशेष

दिनांक ३१ मे च्या जगभरातील घटना, घडामोडी, जन्म, मृत्यू आणि जागतिक दिवस.

आजचे पंचांग (सोमवार, मे ३१, २०२१) युगाब्द : ५१२३
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक ज्येष्ठय १० शके १९४३
सूर्योदय : ०५:५७ सूर्यास्त : १९:०७
चंद्रोदय : ००:०७, जून ०१ चंद्रास्त : १०:४३
शक सम्वत : १९४३ प्लव
चंद्र माह : वैशाख
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथि : षष्ठी – ०१:०५, जून ०१ पर्यंत
नक्षत्र : श्रवण – १६:०२ पर्यंत
योग : ब्रह्म – ०६:०४ पर्यंत
क्षय योग : इन्द्र – ०४:१४, जून ०१ पर्यंत
करण : गर – १३:३३ पर्यंत
द्वितीय करण : वणिज – ०१:०५, जून ०१ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मकर – ०३:५९, जून ०१ पर्यंत
राहुकाल : ०७:३६ ते ०९:१५
गुलिक काल : १४:११ ते १५:५०
यमगण्ड : १०:५४ ते १२:३२
अभिजितमुहूर्त : १२:०६ ते १२:५९
दुर्मुहूर्त : १२:५९ ते १३:५१
दुर्मुहूर्त : १५:३७ ते १६:२९
अमृत काल : ०५:४१, जून ०१ ते ०७:१७, जून ०१
वर्ज्य : २०:०३ ते २१:३९

तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले . महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

( एक विरोध भास – तंबाखू जन्य पदार्थांमुळे कर्करोग होतो सरकार त्यासाठी जागरुकतेसाठी खर्च करते , रुग्णांना कमी खर्चात औषधे पुरवते इ. पण महसूल मिळावा म्हणून तंबाखू जन्य पदार्थ निर्मिती साठी खुले परवाने देते. )

आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला तुंगांपासून वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.

उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले.

एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या “कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट” म्हटले आहे. तर एक इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.
१७२५: महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५)

* घटना :
१९१०: दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.
१९१६ : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळविणारच !”……
ब्रिटीश सरकारला धडकी भरविणारी ही ‘सिंहगर्जना’ लोकमान्य टिळकांनी १०६ वर्षांपूर्वी केली होती.

१९३५: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले.
१९५२: संगीत नाटक अकादमी ची स्थापना.
१९६१: दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.
१९७०: पेरू देशातील ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे ७०,००० च्या दरम्यान मृत्युमुखी पडले आणि ५०,००० जण जखमी झाले.
१९९०: नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.

• मृत्यू
• १८७४: प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८२२ – मांजरे, पेडणे, गोवा)
• १९७३: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९०२ – गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)
१९९४: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पद्म भूषण पंडित सामताप्रसाद यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२१ – वाराणसी)
• २००२: लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर, १९२९)
• २००३: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचे निधन. (जन्म: ७ जुलै,१९१४)

* जन्म
१९१०: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर, २००१)
१९२१: आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर,१९८६ )
१९२८: क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी, २००१)
१९३८: नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे यांचा जन्म. ( मृत्यू : ९ मार्च, २०१७)

Comments are closed.