Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

उन्हाळी धानाची खरेदी दोन दिवसात सुरु न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी हंगामातील धान अद्याप ही आदिवासी विविध सहकारी सोसायट्या मार्फत खरेदी करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व असंतोष पसरला असून येत्या दोन दिवसाच्या आत खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान खरेदी न केल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा आविसं नेते व जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील व अहेरी विधानसभा क्षेत्रातील उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येचा मुद्दा जि. प. अध्यक्ष कंकडालवार यांनी उचलून धरला असून यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा याविषयी पाठपुरावा केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जर येत्या दोन दिवसांत उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांची उन्हाळी धान आदिवासी विविध सहकारी सोसायट्यामार्फत खरेदी न सुरु झाल्यास आविस नेते व माजी आमदार दिपक आत्राम यांच्या मार्गदर्शनात व जि. प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात कोविड नियमांचे पालन करून शांतीपूर्ण आंदोलनासाठी धान उत्पादक शेतकरी व आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते तयारीत आहेत.

अहेरी उपविभागातील सिरोंचा तालुक्यात असलेल्या आदिवासी विकास महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या धान खरेदी केंद्रावर अद्यापही उन्हाळी धान खरेदी सुरु न झाल्या असल्याबाबत धान उत्पादक शेतकऱ्यांनी समस्या आपल्या समोर मांडल्या. या समस्येवर आपण आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या समस्या त्यांना अवगत केल्या. या मुद्द्यावर जिल्हाधिकारी यांच्यासोबतही आपण वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असून येत्या दोन दिवसात धान खरेदी सुरु न झाल्यास शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

अजय कंकडालवार – अध्यक्ष, जिल्हा परिषद गडचिरोली 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

लॉकडाऊन काळात राज्यातील कृषी दुकानं दिवसभर राहणार सुरु

Comments are closed.