Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 170 कोरोनामुक्त, एका मृत्यूसह 33 नवीन कोरोना बाधित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 31 मे: आज जिल्हयात 33 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 170 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 29335 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 27838 वर पोहचली. तसेच सद्या 778 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत जिल्हयात एकूण 719 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एक नवीन मृत्यूमध्ये 70 वर्षीय पुरुष  मालेरा ता. मुलचेरा, यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.50 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.65 टक्के तर मृत्यू दर 2.45 टक्के झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन 33 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 13, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी 07, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 01, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 02, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 05 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 01 जणांचा समावेश आहे.

gadchiroli corona sheet

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तर आज कोरोनामुक्त झालेल्या 170 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 38, अहेरी 11,  आरमोरी 13, भामरागड 08, चामोर्शी 28, धानोरा 08, एटापल्ली 04, मुलचेरा 19, सिरोंचा 31, कोरची 00, कुरखेडा 06 तसेच वडसा येथील 04 जणांचा समावेश आहे.

हे देखील वाचा:

धक्कादायक!! आलापल्लीत राहत्या घरी महिलेचा आढळून आला मृतदेह!

लॉकडाऊन काळात राज्यातील कृषी दुकानं दिवसभर राहणार सुरु

Comments are closed.