Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिलासादायक! इंग्रजी शाळेच्या फी मध्ये २५ टक्के कपात; मेस्टा संघटनेचा मोठा निर्णय

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ५ जुलै  : राज्यातील इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या संघटनेने इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या १८ हजार शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णयही मेस्टाने घेतला आहे.

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर काहींना वेतन कपातीला सामोरं जावं लागलं. त्यामुळे इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या अनेक पालकांना शुल्क भरणे अशक्य झालं आहे. कोरोना काळात शाळा बंद असतानाही अवास्तव शुल्क आकारण्याच्या मुद्यावरून अनेक शाळांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. पण आता पालकांची अडचण व सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अखेर २५ टक्के शुल्क कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अनेक पालकांनी शाळेचे शुल्क न भरल्यामुळे संस्थाचालकांना शाळा चालविणे अवघड झालं आहे. तर ऑनलाइन वर्ग सुरू असल्याने ज्या सुविधांचा वापर होत नाही त्या सुविधांचे शुल्क आकारू नये, अशी मागणी पालक करत होते. सर्वोच्च न्यायालयाने १५ टक्के फी करण्याचे सूचित केले होते. त्यामुळे मेस्टाने हा निर्णय घेतला आहे. हा लाभ राज्यातल्या १८ हजार शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवेगाव नागझिरात आढळला काळा बिबट्या; प्रथमच दिसले नर-मादी एकत्र

भामरागड येथील बाजारपेठेतील १२४ दुकानदारांचे त्वरित पुनर्वसन करा – त्रिवेणी व्यापारी संघटना

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याचे वाटप

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.