सातत्य, चिकाटीतूनच ध्येय गाठता येते : नितीन पाटील
सक्सेस अॅबॅकसच्या २८ विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी; नऊ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सातत्यपूर्ण सराव, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ध्येय गाठता येते, हे सक्सेस अॅबॅकसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून सिद्ध केले. सक्सेस अॅबॅकस पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या प्रथम स्तराच्या परीक्षेत गडचिरोली शाखेचे प्रविष्ट झालेले सर्व २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे, यापैकी नऊ विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्राविण्य संपादन केले.
शंभर टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इशिका रामचंद्र नन्नावरे, कश्यपी श्रीकांत कातरकर, सायबो संतोष नादिया दुर्गे, समृद्धी सागर पुद्दटवार, सायांश लवकुश करकाडे, सोनाक्षी रविंद्र कुमरे, उत्कर्ष संजय पुन्नावार, अन्विधा अमोल राजुरकर आणि देवश्री राजकुमार देवके यांचा समावेश आहे.
तर आदित्य कैलास कुळमेथे, अंश मुकेश नामेवार, अर्णव निलेश लोडलीवार, भाविक राजेश गौरकर, अथर्व नरेंद्र दहिकर, गौरी ज्ञानेश्वर सातपुते, ग्राही जितेंद्र रोहनकर, ग्रंथा गुणवंत दहिकर, मांगल्य महेंद्र सिडाम, निद्याथी स्वप्नील बांबोडे, निशांत नंदकुमार हलामी, प्रवेशा मनोज चलाख, रिशान प्रमोद तुलावी, सहिश्नु श्रीकांत कातरकर, सान्वी राजेश गेडाम, तेजस्वी गुलाब डोंगरवार, अंशित कांबडी, रितिशा राजकुमार लांजेवार आणि स्पृहा गजेंद्र मॅडेमवार यांनी ९० ते ९८ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सक्सेस अॅबॅकस गडचिरोली शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपअभियंता नितीन पाटील आणि पंचायत समिती, आरमोरीच्या लेखाधिकारी सुरेखा घुमारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन पाटील म्हणाले की, स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून वेगाने विचार करण्याची क्षमता, अचूकता, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सराव या कौशल्यांनाही मोठे महत्त्व आहे. सक्सेस अॅबॅकसमुळे विद्यार्थ्यांमध्ये ही कौशल्ये विकसित होण्यास मदत होत असून परीक्षेतील विद्यार्थ्यांची कामगिरी त्याचेच द्योतक आहे. गडचिरोली शाखेच्या प्रशिक्षिका पल्लवी साई कोंडावार यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘यश एका दिवसात मिळत नाही; त्यामागे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चिकाटी असते,’ असे सांगत पाटील यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन अनुभव कोंडावार यांनी केले. आभार सक्सेस अॅबॅकस गडचिरोली शाखेच्या प्रशिक्षिका पल्लवी साई कोंडावार यांनी मानले.

