Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१९ वर्षीय तरुणाने दुचाकीसह तलावात उडी घेऊन केली आत्महत्या!

नैराश्येतून १९ वर्षीय तरुणाने नागपूरच्या फुटाळा तलाव येथे दुचाकीसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूचे कारण अस्पष्ट.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर : शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या फुटाळा तलाव परिसरात आज दुपारी दीडच्या सुमारास एका तरुणानं तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

अथर्व राजू आनंदेवार (१९) असं या तरुणाचं नाव आहे. वाडी येथील राहणारा हा तरुण गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता असं सांगितलं जात आहे. यातून काहीही मार्ग न निघाल्यामुळे तरूणाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अथर्वने दुचाकीसह तलावात उडी घेतली. जी दुचाकी घेऊन त्याने तलावात उडी घेतली ती बाहेर काढण्यात यश आले. पण त्याचा मृतदेह अजून रेस्क्यू टीमच्या हाती लागलेला नाही. सध्या युद्धपातळीवर शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिस स्टेशन मधील टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून अथर्वने असं टोकाचं पाऊल का उचललं? याचाही शोध पोलीस घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

“त्या” अवैध दारू विक्रेता, सावकारापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरतेय का?

ब्रेकिंग : चंद्रपुरात बुरखा घालून एका युवकाने भरदिवसा केला गोळीबार

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.