Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कंगना सारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते – खा. रजनीताई पाटील

कंगना राणावत ला सिडीसीएन ऍक्ट नुसार कारवाई करून जेल मध्ये टाका - खा. रजनीताई पाटील यांची मागणी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

मुंबई डेस्क, दि. २० नोव्हेंबर : २०१४ मध्ये ज्यांनी पद्मश्री दिला त्या लोकांनी स्वातंत्र्य दिला असं म्हणणाऱ्या कंगना सारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते, त्यांना सिडीसीएन ऍक्ट नुसार जेल मध्ये टाकलं पाहिजे. अशी मागणी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांनी केली आहे.

ज्यांना लाखो स्वतंत्र वीरांच्या बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य भीक वाटते, अशा लोकांना अटक करून जेल मध्ये टाकलं पाहिजे. मला त्या व्यक्तीचं नाव घ्यायला सुद्धा शरम येते मला त्याच्या अकलेची कीव करावीशी वाटते कारण माझ्या घरा मधील आई-वडील स्वतंत्र सैनिक आहेत. माझे आजोबा गदर चळवळीत २६ व्या वर्षी फासावर चढले लाखो घरातून एवढे मोठे बलिदान दिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

स्वतंत्र सैनिकाच्या पार्श्वभूमीला आणि स्वातंत्र्याला त्यांना एवढे कमी लेखता त्यांच्या बुद्धीला काय म्हणावं या लोकांवर कारवाई का होत नाही? सिडीसीएन ऍक्ट नुसार कारवाई केली पाहिजे. जेल मध्ये टाकलं पाहिजे लाखों लोकांचे बलिदान, भगतसिंग या शहिदांना विसरून, २०१४ मध्ये ज्यांनी पद्मश्री दिला त्या लोकांनी स्वातंत्र्य दिला असं म्हणता अशा पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते. अन्नदात्या शेतकऱ्याला रस्त्यावरील लोक म्हणणाऱ्याची बौद्धिक दिवाळखोरी येथे अशा लोकांना सी डी सी एन अंतर्गत जेलमध्ये टाकले पाहिजे असं वक्तव्य खासदार रजनीताई पाटील यांनी केला आहे. त्या बीडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षक ठार

कोनसरी येथील लोहप्रकल्प निर्माण कामाचे मोठ्या थाटात व्यवस्थापकीय संचालक बि. प्रभाकरन यांच्या हस्ते शुभारंभ

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनाचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.