Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत कोरोनां संसर्गाच्या रुग्णांत वाढ ,तीन शतकाहून अधिक रुग्ण संख्येत एकाच दिवशी वाढ

नवीन 328 कोरोनाबाधित तर 284 कोरोनामुक्त, प्रशासनांनी नागरिकाना कोरोनाचे नियमाचे काटकोरपणे पालन करण्याचे केले आव्हान ..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली,दि.28 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1092 कोरोना तपासण्यांपैकी 328 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 284 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 34217 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 32123 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1341 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 753 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.88 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.92 टक्के तर मृत्यू दर 2.20 टक्के झाला आहे.

आज नवीन 328 बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 69, अहेरी तालुक्यातील 33, आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 126, धानोरा तालुक्यातील 20, एटापल्ली तालुक्यातील 17, मुलचेरा तालुक्यातील 10, सिरोंचा तालुक्यातील 03, कोरची तालुक्यातील 01, कुरखेडा तालुक्यातील 13 आणि वडसा तालुक्यातील 20 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 284 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 139, अहेरी तालुक्यातील 12, आरमोरी तालुक्यातील 15, भामरागड तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 38, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 24, सिरोंचा तालुक्यातील 13, कोरची तालुक्यातील 03, कुरखेडा तालुक्यातील 14,आणि वडसा तालुक्यातील 06 जणाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा ,

त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीच्या संचालकास मारहाण केल्याप्रकरणी आ. धर्मरावबाबांच्या जावयासह ६ जणांवर गुन्हे दाखल

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नक्षलग्रस्त भागात गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद – गृहराज्यमंत्री, शंभूराज देसाई

‘नायरा’ सामाजिक संस्थेने जिल्हापरिषद शाळेचा बदलला चेहरा…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.