ग्रामपंचायत जांभळीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली भेट
मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जाभळी येथील गावकऱ्यांशी केली विविध विषयावर चर्चा .
कोरची –०२ जानेवारी :- जिल्हा परिषद गडचिरोली येथील मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक ३० आणि ३१ डिसेंबर २०२० ला नक्षल ग्रस्त कोरची तालुक्याचा दौरा केला आणि सदिच्छा भेट देत नक्षलग्रस्त भागातील ग्रामपंचायत व पंचायत समितीची पाहणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधुन गावतील समस्या जाणून घेत आहेत या सोबत विविध कार्यालयाची पाहणी करून कार्यालयीन कामकाजाची पाहणी करीत आहेत त्यांच्या दौर्यामुळे दुर्गम भागातील कामचुकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ३१ डिसेंबरला कोरची पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत जांभळी येथे भेट देऊन जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, विहिरी, तलाव, सोलर नळ, नाली व घरकुलांची पाहणी केली. तसेच गावकऱ्या सोबत विविध विषयावर सवांद करून समस्या जाणून नागरिकांना विचारणा केली असता त्यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, गावातील रस्त्यांची समस्या, यंत्रणाची कामे, मोबाईल कवरेज व इंटरनेट बाबतची समस्या, विद्युत पुरवठा ची होणारी समस्या, ग्राम पंचायतीच्या प्रत्येक गावाची नियमीत आरोग्य तपासणी इत्यादी समस्या कार्यकारी मुख्य अधिकारी यांना सांगितले असता सदर समस्येचे निराकरण करण्याचे सकारात्मक प्रतिसाद आशीर्वाद यांनी देऊन लगेच पाठपुरावा करण्याचे आदेश गटविकास अधिकारी डी एम देवरे यांना आदेश दिले व पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता इत्यादी समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे सूचना आशीर्वाद यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या भेटीदरम्यान पंचायत समिती कोरची येथील संवर्ग विकास अधिकारी डी.एम.देवरे, विस्तार अधिकारी राजेश फ़ाये, ग्राम पंचायत सचिव यशवंत लाडे, सरपंच मोहन कुमरे, उपसरपंच मीना ठलाल, ग्रामपंचायत सदस्य रामु नेताम, जगदेव बोगा, शंकर कुमरे, वादीजी मडावी, रामलाल बोगा, आशा वर्कर यामिनी ठलाल आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी जर तालुक्याला अशीच सदिच्छा भेट देऊन तालुक्यातील जनतेशी संवाद साधून समस्या जाणून घेतील तर तालुक्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी केली आहे .
Comments are closed.