Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘या’ गावात बिबटयाची पुन्हा दहशत!… ५ शेळ्या केल्या फस्त; ६ दिवसात दूसरी घटना

बिबटयाच्या उपस्थितिने शेतीचे कामे खोळंबली

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

भंडारा : जिल्ह्यातील माटोरा गावात बिबटयाची पुन्हा दहशत पहायला मिळाली असून ह्या बिबटयाने ५ शेळी फस्त केल्या आहे. विशेष म्हणजे ६ दिवसात अशी दूसरी घटना आहे.

माटोरा येथील रहिवासी कृष्णा शेंडे यांनी घरालगत असलेल्या गोठयात ५ शेळ्या बांधल्या होत्या. रात्रीच्या सुमारास बिबटयाने गोठयात प्रवेश करत ५ ही शेळ्या ठार केल्या. सकाळी लक्षात आल्यावर त्यांना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याबाबत गावात माहिती वाऱ्यांसारखी पसरल्याने गावात बिबटयाच्या अस्तित्वाने गावात दहशती पसरली असून बिबटयांने ६ दिवसात दोनदा ह्या गावात प्रवेश करत सुरुवातीला मारवाडे यांच्या २ शेळ्या आणि आता शेंडे यांच्या ५ शेळ्या मारल्याने आता बिबटयाच्या उपस्थितीने शेतीचे कामे खोळंबली आहे.

जवळच कोका जंगल परिसर असून वन्य प्राण्याचे सततच्या गावातील उपस्थितिने गावकऱ्यांत रोष असून बिबटयाच्या बंदोबस्त लावून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकरण : आंदोलनप्रकरणी आठ जणांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ नराधमास दहा वर्षे सश्रम कारावास

वनपरिक्षेत्र अधिकारी आणि लिपिकावर निलंबनाची टांगती तलवार!; वनकर्मचाऱ्यांनी दस्ताऐवजासह केली लेखी तक्रार

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.