Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वसईला निघालेली मुलगी वाट चुकून गेली जळगांवला !

नायरा फाउंडेशन आणि पोलिसांच्या मदतीने पोहोचली सुखरूप घरी...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई ,दि १४ डिसेंबर : वसई तालुक्यातील मजिवली गावातील वीटभट्टीवर काम करण्यासाठी भिवंडी येथे गेलेली मुलगी घरी यायला निघाली, मात्र वाट चुकल्याने ती थेट जळगाव मधील पारोळा येथे पोहोचली. रुपाली कृष्णा पासले (१५) असे या मुलीचे नाव असून, पोलिस आणि नायरा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन गायकवाड यांच्या मदतीने ती सुखरूप घरी पोहोचली.

त्यामुळे रुपालीच्या कुटुंबीयांनी पारोळा आणि मांडवी पोलिस यांच्यासह गायकवाड यांचे आभार मानले असून रोहन गायकवाड यांच्या सेवाभावी वृत्ती आणि सवेदनशिलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.पालघर जिल्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातून आजही अनेक गरीब आदिवासी पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. आपल्याच नातेवाईकांसोबत वीटभट्टीवर काम करण्यासाठी वसई तालुक्यातील मजिवली गावातील रुपाली कृष्णा पासले (१५) ही मुलगी देखील भिवंडी येथे गेली होती. दोन दिवसांपूर्वी रुपाली भिवांडीहून घरी येण्यासाठी निघाली खरी, मात्र चुकीच्या वाहनात बसल्याने ती नकळत ती जळगा परोळ्यात जाऊन पोहोचली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पारोळा पोलिसांनी रुपलीला गोंधळलेल्या स्थितीत बघताच तिची चौकशी केली असता तिने गावचा पत्ता सांगितला. आणि आपण रस्ता चुकून वाहने बदलत येथपर्यंत पोहोचल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यावेळी पारोळा पोलिसांनी तात्काळ वसई पोलिस आणि मग मांडावी पोलिसांना संपर्क करून रुपाली बाबत माहिती दिली. मांडावी पोलिसांनी माजीवली गावच्या पोलीस पाटील यांच्या मार्फत रुपालीच्या घरच्यांशी संपर्क केला असता, रुपाली भिवंडी येथून घरी येण्यासाठी निघाली मात्र अद्याप पोहोचली नसल्याचे सांगितले.

पोलिसांनी रुपाली सुखरूप असल्याचे सांगताच तिच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. परंतु रुपालीच्या त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने जळगाव हून रुपालीला घरी कसे अनायचे..? घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या कुटुंबाने जळगांवला जाऊन मुलीला घेऊन परत यायचे म्हटले तर, १२ ते १५ हजार रुपये खर्च येणार असल्याने ते चिंतेत होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे रूपालीला परत आणण्यासाठी येणारी अडचण श्रमजीवी सेवादलाचे कार्यवाहक निलेश वाघ यांच्या लक्षात आली, त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती आयटी तज्ज्ञ आणि नायरा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री रोहन गायकवाड यांना दिली. सदर अडचण सेवाभावी वृत्ती आणि सवेदांशिलता जपणारे रोहन गायकवाड यांनी तात्काळ मदत करून रुपलील पारोळा येथून आणण्याची सर्व व्यवस्था केली आणि तिला सुखरूप तिच्या घरी पोहचवले.

यावेळी त्यांच्यासोबत निलेश वाघ आणि विलास मोरघे उपस्थित होते. श्री रोहन गायकवाड आणि पोलिसांनी दाखवलेला कर्तव्यदक्षपणा आणि संवेदनशील पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे

हे देखील वाचा,

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच नेचर सफारी चे उदघाटन

Comments are closed.