Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपालांनी पाठवले ठाकरे सरकारला पत्र, मुख्यमंत्र्यांना करून दिले स्मरण

पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होत आहे. त्याआधी राज्यपाल यांनी महाविकास आघाडी सरकारला स्मरण करून दिले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, ३० जून : पावसाळी अधिवेशनाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. मागील अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा, याबद्दल आठवण करून दिली आहे.

विधानपरिषदेचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होणार आहे. मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडले होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद महत्वाचे असून पद रिक्त आहे. याची आठवण करुन देण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या आधीही राज्यपाल कोश्यारी यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या रिक्त संदर्भात राज्य सरकाराला पत्र पाठवले होते. पण, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झाला नाही.

पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होत आहे. त्याआधी राज्यपाल यांनी महाविकास आघाडी सरकारला स्मरण करून दिले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी राज्यपाल यांची भेट घेतली होती. यावेळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा तसंच विधानसभा अध्यक्षपद निवडणूक याबद्दल निवेदन दिले होते. आज याच संदर्भात राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र पाठवले आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! एकाच महिलेला एकाच वेळी दिले कोरोना लसीचे तीन डोस!

पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असताना देखील नागरिकांची …या धबधब्यावर प्रचंड गर्दी

सोशल मीडियावर विदेशी व्यक्तीसोबत झालेली ओळख अमरावतीच्या महिलेला पडली महागात…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.