Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सीआरपीएफ जवान मिलिंद ठाकूर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

छत्तीसगडमध्ये रेल्वे ट्रॅकवर कटलेल्या अवस्थेत आढळलेल्या सीआरपीएफ जवानाचा अमरावती जिल्ह्यात असलेल्या पिंपळ विहीर येथे त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

वृत्तसंस्था : छत्तीसगड राज्यामध्ये कर्तव्य बजावत असलेला सीआरपीएफ जवान घरी परतताना त्याचा मृतदेह हा छत्तीसगडमध्ये एका रेल्वे ट्रॅकवर कटलेल्या अवस्थेत आढळला होता.

सदर घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना प्राप्त होताच घटनास्थळी दाखल झाले असता चौकशी दरम्यान सीआरपीएफ मध्ये कार्यरत असून त्या जवानाचे नाव मुकुंद ठाकरे असे तपासात उघड होताच त्यांचा मृतदेह स्व:गावी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या पिंपळ विहीर येथे आणण्यात आला असून त्यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुकुंद ठाकरे हे गेल्या अनेक वर्षापासून सीआरपीएफ मध्ये कार्यरत असून छत्तीसगड राज्यातील  नक्षल भागात कार्यरत होते. सोमवारी मुकुंद ठाकरे घरी येण्यासाठी निघाले होते. मात्र ते घरी न परतल्याने घरच्यांनी पोलिसात धाव घेतली त्यानंतर त्यांचा मृतदेह रेल्वे रुळावर कटलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान आज त्याचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

मुकुंद ठाकरे अत्यंत प्रेमळ मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांची ओळख जनमानसात चांगली होती. त्यांच्या अचानक जाण्याने परिवारावर दुख्खाचा डोंगर कोसळला असून गावातही सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा  :

चार दिवसाच्या चिमुकलीची वैरीण झाली माता, कॅरीबॅगमध्ये बेवारस सोडून केले स्वतःचे पलायन!

 

Exclusive Story : शववाहिका चालक म्हणून काम करते ‘हि’ जिगरबाज मुलगी

मयूर फरताडेने शोधून काढला फेसबुक इन्स्टग्रामवरचा बग

Comments are closed.