Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक

रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला केली अटक.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

महात्मा गांधीं बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजला अटक केली आहे. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातमी : महात्मा गांधींवर वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद २०२१ चा कार्यक्रमा दरम्यान, शेवटच्या दिवशी संत कालीचरण यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरले. कालीचरण यांचे वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवरील लिपिक पदांच्या एकूण २४७ जागांंसाठी भरती

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळात (ESIC) ५९४ जागांसाठी मेगा भरती

अबब!! आता न्यायाधीशच्या जागी मशीन लावणार निकाल!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.