Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला?

बुलडाण्यातील व्यापाऱ्याने बुडवले तब्बल 100 कोटी...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
  • ९  महिन्यात GST कराचे बुडवले तब्बल पावणे दोन कोटी.
  • बनावट कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्केही बनावट.
  • खामगाव येथील व्यापारी नितीन टावरी विरुद्ध गुन्हा दाखल.

बुलडाणा, दि. ८ फेब्रुवारी :  एका व्यापाऱ्याने चक्क केंद्र सरकारच्या तिजोरीवरच तब्बल १०० कोटींचा डल्ला मारल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.  या व्यापाऱ्याने GST कराचे तब्बल १०० कोटी रुपये बुडवले असल्याचा हा प्रकार खामगाव येथील GST कर सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी उघडकीस आणला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर प्रकरण कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून नितीन टावरी नामक या व्यापाऱ्याने चक्क बनावट दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के सुद्धा बनावट वापरल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नितीन टावरी नामक या व्यापाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील MIDC मध्ये देवकी ऍग्रो इंडस्ट्री च्या मालकाने २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या ९ महिन्याच्या काळात तब्बल १ कोटी ७५ लाखांच्या जवळपास GST बुडवल्याचं एका ऑडिट मधून स्पष्ट झाल आहे.  शिवाय बनावट दस्तऐवज आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि शिक्के वापरून कर चोरण्याचा प्रकार केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यामुळे या देवकी ऍग्रो इंडस्ट्रीच्या नितीन टावरी विरुद्ध तक्रार देत विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे नितीन टावरी नामक या व्यापाऱ्याकडे तब्बल ६ कंपन्या आहेत व या कंपन्यांचे ऑडिट केल्या नंतर तब्बल १०० कोटी रुपयांच्या GST कर बुडवल्याच समोर येईल असा दावा GST सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी केला आहे.

हे देखील वाचा : 

“महाराष्ट्राच्या ‘एकलव्य’ चा जगविख्यात फोर्ब्सच्या यादीत समावेश”

2022 चा उपमहापौर श्री वासिम शेख तर स्वर्गीय लता मंगेशकर महिला उपमहापौर श्री चा किताब पूजा गौडा ला प्रदान

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.