Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

हिजाबच्या निर्णयाविरुद्ध एल्गार… राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला, युवती रस्त्यावर..

मालेगावात कर्नाटक सरकारच्या हिजाबविराेधी भूमिकेचा निषेध..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था,  दि. ८ फेब्रुवारी  : कर्नाटक राज्यात सत्ताधारी भाजप सरकारने विद्यार्थीनींसाठी ड्रेसकाेड तयार केला आहे. यात हिजाब व बुरख्याला विराेध करत मुस्लिम विद्यार्थीनींना महाविद्यालयांमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या नेतृत्वाखाली सुपर मार्केट परिसरात विद्यार्थीनींनी निदर्शने केली.

कर्नाटकच्या उडपी जिल्ह्यात महाविद्यालय व विद्यालयातील विद्यार्थीनींसाठी विशिष्ट ड्रेसकाेड तयार करण्यात आला आहे. बुरखा व हिजाब परिधान करुन शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थीनींना ड्रेसकाेडची सक्ती केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या निर्णयास विराेध करणाऱ्या विद्यार्थीनींना प्रवेश नाकारुन त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आराेप करत निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादी विद्यार्थी सेलच्या पदाधिकारी व विद्यार्थीनींनी एकत्र येत कर्नाटक सरकारचा निषेध नाेंदवला. हाती निषेधाचे फलक घेत सुपर मार्केट परिसरातून रॅली काढली.

सरकारने ड्रेसकाेड रद्द करावा, हिजाब व बुरख्यास विराेध न करता तातडीने मुस्लिम विद्यार्थीनींना विद्यालय व महाविद्यालयांमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी करण्यात आली. सरकारने आपला निर्णय न बदल्यास लाेकशाही मार्गाने तीव्र स्वरुपाचे आंदाेलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

2022 चा उपमहापौर श्री वासिम शेख तर स्वर्गीय लता मंगेशकर महिला उपमहापौर श्री चा किताब पूजा गौडा ला प्रदान

“महाराष्ट्राच्या ‘एकलव्य’ चा जगविख्यात फोर्ब्सच्या यादीत समावेश”

धक्कादायक! केंद्र सरकारच्या तिजोरीवर 100 कोटींचा डल्ला?

 

Comments are closed.