Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अबब! झोपेतही “हा” व्यक्ती कमवतो लाखो रुपये…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  

वृत्तसंस्था, दि. २८ फेब्रुवारी :  आत्तापर्यंत तुम्ही जगभरातील अनेक आश्चर्यकारक नोकऱ्यांबद्दल ऐकले असेल, परंतु या नोकरीबद्दल जाणून तुम्ही देखील हादरून जाल. ज्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते खरंय. जगात असा एक व्यक्ती आहे जो झोपेतही तब्बल २ लाख रुपये कमवतो

आजकालच्या जगात कोण, कधी आणि कोणत्या विचित्र मार्गाने पैसे कमवेल याचा काही नेम नाही. कोणी युट्युबवरून तर कोणी इतर मार्गांनी पैसे कमावतात. एखादा व्हिडीओ ट्रेंडिंग सुरू झाला तर मजा येते. एक व्यक्ती झोपेत असताना त्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतो आणि नंतर त्याला लाखो रुपये मिळतात. आम्हाला खात्री आहे की या अद्भुत कामाबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फक्त झोपण्याचं करतो काम

यूट्यूबवर सुपर मेनस्ट्रीम नावाचे एक चॅनल आहे, ज्यावर एक व्यक्ती त्याचा लाइव्ह व्हिडिओ अपलोड करतो. तो आठवड्यातून एक रात्र सहा तास झोपतो, ज्या दरम्यान लाइव्ह व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो, त्यानंतर तो त्याच्या चॅनेलवर अपलोड करतो. लोक त्याचा व्हिडिओ पाहतात आणि त्यामुळे या व्यक्तीला तब्बल लाखो रुपये मिळतात. यावर विश्वास बसत नसला तरी हे अगदी खरंं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लोक करतात उठवण्याचा प्रयत्न

यूट्यूबवर अनेक लोक यूट्यूब व्हिडिओ बनवतात. सुपर मेनस्ट्रीम चॅनलवर झोपून पैसे कमावणाऱ्या व्यक्तीचे चाहते त्याला अलेक्साच्या माध्यमातून संदेश पाठवतात. लोक गाणी वाजवून त्याला उठवण्याचाही प्रयत्न करतात. हा YouTuber फक्त २१ वर्षांचा आहे आणि आठवड्यातून सहा तास शांत झोप घेऊन तो £2,000 (रु.२ लाख) पेक्षा जास्त कमावतो.

हे देखील वाचा : 

10 वी पास उमेदवारांसाठी गोव्यात नोकरीची मोठी संधी

गोंदियाच्या बिर्शी विमानतळा वरून १३ मार्च ला उडणार पहिला प्रवाशी विमान

गडचिरोली जिल्ह्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा रद्द : जिल्हाधिकारी संजय मीणा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.