Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा रद्द : जिल्हाधिकारी संजय मीणा

- मंदिरामध्ये ५० लोकांच्या मर्यादेत धार्मीक कार्यक्रम करण्यास परवानगी.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २७ फेब्रुवारी : कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी मार्कंडादेवसह चपराळा, अरततोंडी, वैरागड व अन्य ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रा रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. तथापि, ५० लोकांच्या उपस्थितीत संबंधित मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पाडता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त पाच-सहा दिवस मोठी यात्रा भरते. या यात्रेत विदर्भासह छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश इत्यादी राज्यांमधूनही लाखोंच्या संख्येने भाविक येतात.

शिवाय दुकानदारही मोठ्या प्रमाणात स्टॉल लावतात. अशाच यात्रा चपराळा, अरततोंडी, वैरागड इत्यादी ठिकाणीही भरतात. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व यात्रा रद्द केल्या आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्या जिल्ह्यांमध्ये ३० जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या ९० टक्के नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असेल किंवा ७० टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असतील अशा जिल्ह्यांचा समावेश शासनाने परिशिष्ट अ मध्ये केला असून, त्या जिल्ह्यांना निर्बंधांमध्ये अतिरिक्त शिथिलता दिलेली आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्याचा समावेश परिशिष्ट ‘अ’ मध्ये नाही.

शिवाय सद्यःस्थितीत गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी दिसून येत असली तरी मार्कडादेवसह अन्य ठिकाणच्या नदीपात्रांमध्ये दरवर्षी होणारी गर्दी बघता कोरोना विषाणूचा प्रादुर्भात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा समुहास साधरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंड संहिता १८६९ नुसार कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.

हे देखील वाचा : 

गडचिरोली वनवृत्तात सेवानिवृत्त अधिकारी आजही कार्यरत!

आलापल्ली येथील जैवविविधता उद्यान मोजतेय अखेरची घटका

आलापल्ली येथे महिला व किशोरवयीन मुलींसाठी कार्यशाळेचे आयोजन

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.