Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आयआयएम नागपूर कॅम्पसचे राष्ट्रपतींच्या हस्ते 8 मे रोजी होणार उदघाटन नागपूर

132 एकरवर साकारले आयआयएमचे नवे कॅम्पस.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नागपूर, दि. ७ मे : इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या ( आयआयएम ) नव्या इमारत व परिसराचे उद्घाटन 8 मे रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत सकाळी 10 वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

132 एकर भूमीवर इंडियन इॅन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) नागपूरचे कॅम्पस साकारले आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले असून मिहानमधील एम्स हॉस्पिटलच्या बाजूला आयआयएमची संपूर्ण उभारणी झाली आहे. सद्या 668 विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड देखील करण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याठिकाणी 20 हायटेक क्लासरुप आणि 24 प्रशिक्षण केंद्रे तसेच 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला असून त्याद्वारे आपले ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी विविध क्षेत्रात उपयुक्त ठरणारे प्रबंधन प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय याठिकाणी राहणार आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप व नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारे या योजनांचा लाभ आयआयएम विस्तार योजनेत आगामी काळात एकूण 7 सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे.

यापूर्वी 23 एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते या विस्तारीत कॅम्पसचे उद्घाटन होणार होते. दौरा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता हा उद्घाटन सोहळा 8 मे रोजी होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे ‘आयआयएम’ सोहळ्यासाठी आज नागपूरात आगमन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते होणार माडीया सांस्कृतिक महोत्सव 2022 चे उद्घाटन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पुस्तकाच्या गावाला भेट !

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.