Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वाब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अमरावती, दि. ३ फेब्रुवारी : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी घटना अमरावती शहरात २८ जुलै २०२० रोजी घडली असून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये एका युवतीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ही आल्याचे सांगून परत एकदा युवतीच्या गुप्तांगातून (योनी) द्वारे स्वाब घेण्यात आला होता, त्यामुळे मोदी हॉस्पिटलचा लॅब टेक्निशियन अलकेश अशोक देशमुख या आरोपी विरोधात बडनेरा पोलिसांनी बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने १२ साक्षीदाराचे बयान घेतले यात जिल्हा न्यायालयाने १५ महिन्या नंतर यात निकाल देत आरोपी अलंकेश देशमुख याला१० वर्ष सक्षम कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी बाजू मांडली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बडनेरा येथील मोदी हॉस्पिटल मध्ये या तरुणीचा विनयभंग झाल्या नंतर भाजपच्या वतीने आरोपीवर तातडीने कारवाई व शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले होते,भाजप या अत्याचार ग्रस्त तरुणीच्या मागे ठाम उभा होता व राहील, त्यामुळे या निकालावर भाजपने समाधान व्यक्त केले.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“या” बिल्डरच्या बॉडिगार्ड्सकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण

जिल्ह्यात कोरोनाने एका महिलेचा मृत्यू, नवीन 158 कोरोनाबाधित तर 327 कोरोनामुक्त 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.