Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अमरावतीत पकडलेल्या ५८ उंटाना राजस्थानात पाठवा – राज्यस्थान येथील सामाजिक संघटनेची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

राजस्थानातून हैदराबाद कडे जाणारे ५८ उंट अमरावती पोलिसांच्या ताब्यात आहे. या उंटाची कत्तलीसाठी तस्करी होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. तर याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. तर या सर्व उंटाना अमरावती येथील गोरक्षनाथ ठेवण्यात आले आहे.

मात्र राजस्थान सरकारला ते उंट सोपविण्यात यावे. अशी मागणी जनचेतना अभियान आणि आंदोलन संस्थेचे अध्यक्ष सुजीतकुमार चौधरी यांनी केली, ८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे हे उंट पकडले होते. त्या नंतर प्राणीप्रेमींना आक्षेप घेत निर्दयपणे व कत्तलीसाठी उंटाची तस्करीचा आरोप केला होता तर सध्या जिल्हा न्यायालयात या उंटाच्या प्रकरणात सुनावणी चालू असून या उंटाना महाराष्ट्र राज्यातील वातावरण सहन होत नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे त्यांच्या चारापाणीची व्यवस्था करून राज्यस्थानला हे उंट पाठवा अशी मागणी सुजितकुमार चौधरी यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली तर हे उंट बेकायदेशीर रित्या पकडले असा आरोप सुजितकुमार यांनी केला.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

युवतीच्या गुप्तांगाचा कोरोना स्वाब घेणाऱ्या लॅब टेक्निशियनला १० वर्षाची शिक्षा

वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

राज्य शिक्षण मंडळाचे परीक्षेसंदर्भात मोठे निर्णय; दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार

 

Comments are closed.