Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

१५० किलोच्या गांजा तस्करीत आयुक्तालयातील पोलीसाला अटक 

छत्तीसगढ-ओडिसा सीमेवर पोलिसांची कारवाई 

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई डेस्क, दि. ११ फेब्रुवारी : मुंबईत विक्रीसाठी १५० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात छत्तीसगढ पोलिसांना यश आले आहे. या सहा आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून तो  मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय मुख्यालयात सेवेत असल्याची माहिती मिळाली आहे.

साजिद पठाण असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. छत्तीसगढच्या बस्तर पोलिसांना महागड्या गाड्यातून गांजाची मोठ्याप्रमाणात  तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी छत्तीसगढ-ओडीसा सीमेवर गाड्यांच्या तपासणी करत सापळा रचून आरोपींना अटक केली. बाजार भावानुसार जप्त केलेल्या गांज्याची किंमत 7 लाख 50 हजार इतकी असून त्याची  मुंबई परिसरात हा विक्री केली जाणार होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

अट्टल चोरी करणाऱ्या चोराला पोलीस पकडायला गेले असता चोरांचाच संशयास्पद मृत्यु…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार…

दगडूशेठ गणपती ला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.