Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अट्टल चोरी करणाऱ्या चोराला पोलीस पकडायला गेले असता चोरांचाच संशयास्पद मृत्यु…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ठाणे, दि. ११ फेब्रुवारी : भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा या इराणी नागरीकांच्या वस्तीत एका अट्टल चैन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यास पकडण्यासाठी पोलीस पथक रात्री गेले असता त्यांच्यात झटपट होऊन तो आपल्या भावाच्या ताब्यात असताना त्याचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरीकांनी पोलीसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गोंधळ घालून मृतदेह घेऊन जाण्यास अडथळा केला. त्यानंतर स्थानिक पोलीसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या परिसरात तैनात करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना साठी मुंबई जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सादिक कंबल जाफरी असे मृत चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांना विरोध वाढल्यामुळे स्थानिक पोलीसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या घेऊन पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त व मोठा पोलीस फौजफाटा घेऊन त्या ठिकाणी दाखल होत जमवास पांगवुन मृतदेह ताब्यात घेतला असून या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून कुटुंबियांच्या मागणी नुसार मृतदेह शवविच्छेदना साठी जे जे रुग्णालय मुंबई येथे रवाना केले असून मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्या नंतर उचित कारवाई करण्यात येईल अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त  योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

सी आय एस एफ जवानांचा अपघातात दुर्दवी मृत्यू

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हिंगणघाट जळीतकांड निकाल : विक्की नगराळेला जन्मठेपेची शिक्षा

चंद्रपूरचा ‘सारंग बोबडे’ फोर्ब्सच्या यादीत

 

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.