Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याच्या हल्यात ठार झालेल्या मुत्ता टेकुलवार यांच्या कुटूंबाची विजय खरवडे यांनी दिली सांत्वन भेट..

बिबट्याच्या हल्यात ठार झालेल्या मुत्ता टेकुलवार यांच्या कुटूंबाला विजय खरवडे यांनी दिली आर्थीक मद्दत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,०५ सप्टेंबर : आलापल्ली वनविभागा अंतर्गत येणा-या मुलचेरा तालुक्यातील लगाम जवळील येल्ला येथील मुत्ता टेकुलवार हे शेतातील विहरीत मासोळीला पकडण्याच्या गरा द्वारे तयारीत असताना अचानकपणे नरभक्षक बिबट्याने मुत्ता टेकुलवार यांचेवर आत्मघाती हल्ला करुन त्याला जिवानिशी ठार मारलं. याची माहिती मिळताच  दु:खात असलेल्या मुत्ता टेकुलवार यांच्या कुटूंबाची भारतीय जनसंसदेचे जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे आणि भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे राज्य समिती विश्वस्त डाँ.शिवनाथ कुंभारे यांनी मुत्ता टेकुलवार यांच्या येला येथील त्यांचे घरी जावून त्यांचे पत्नी व मुलांना आर्थीक मदतीचा हाथ दिला व सामाजीक बांधीलकी जोपासली.

या वेळी मुत्ता टेकुलवार यांची पत्नी लक्ष्मी टेकुलवार, मुलगा सुरेश टेकुलवार, महेश टेकुलवार तसेच व्यंकटेश केथीरेड्डी,रोहीत हर्षे,सत्यनारायन टेकुलवार,किशोर पानेवार,पोच्चा टेकुलवार,कमलाबाई टेकुलवार,साविञीबाई पानेवार व अन्य मंडळी सोबत होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी वनविभागाला कळवून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन विजय खरवडे यानी कुटूंबियाना दिले व कुटूंबाची सांत्वना करण्यात आली.

वनविभाग वडसा व गडचिरोलीच्या जंगल परीसरात नरभक्षक वाघाने गेल्या वर्षभरात तब्बल अकरा लोकांचे बळी घेत अनेकाना जखमी केले. या बाबत भारतीय जनसंसदेने व परीसरातील जनतेने ठिय्या व जेलभरो आंदोलन करुन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले .
त्यावेळी  गडचिरोली वनवृतातील वनसंरक्षकानी वाघाला जेरबंद करण्याची वन्यजिव नागपूर यांचे कडून परवानगी मिळविली व एकीकडे दोन पिंजरे लावुन नरभक्षक वाघाला पकडण्याची प्रक्रीया सुरु असतानाच पुन्हा आलापली वनविभागात नरभक्षक बिबट्याने मुत्ता टेकुलवार यांचेवर आत्मघाती हल्ला करुन त्याला जिवानिशी ठार मारल्याने स्थानिक नागरिकात दहशत निर्माण झाली आहे ,वन विभाग वेळीच दखल घेतील त्या संदर्भात पत्रव्यवहार केला जाणार असून मृतकाच्या परिवाराला न्याय मिळेपर्यंत प्रयत्न करणार ,

विजय खरवडे

जिल्हा अध्यक्ष भारतीय जनसंसद

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

Loksparsh Exclusive : त्या…नरभक्षक वाघाने घेतला तीन वर्ष्यात अकरा जनांचा बळी, मानवी जीवितास धोका ठरलेल्या वाघाला जेरबंद करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)यांचे आदेश,

बिबट्याने पाडला मासोळी पकडण्यासाठी गेलेल्या इसमाचा फडशा

कोरची ग्रामीण रुग्णालयात सदोष विद्युत जोडणीमुळे नेहमी होते राहते खंडीत,अतिआवश्यक वेळीच सुरू केले जाते जनरेटर!

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.