Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

श्रमदानातून ग्रामदुतांनी केली स्मशानभूमीची स्वच्छता,’एक दिवस गावासाठी’ उपक्रम : नांदा येथील युवकांचा पुढाकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

 चंद्रपूर दि,०५ सप्टेंबर : कोरपना तालुक्यातील नांदा येथे ग्रामदुत फाउंडेशनच्या माध्यमातूनएक दिवस गावासाठी‘ या उपक्रमाअंतर्गत स्मशानभुमीची स्वच्छता करण्यात आली. नांदा येथील ग्रामदुत युवकांनी यासाठी विशेष पुढाकार घेवून श्रमदानातून शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पावसाळ्यात स्मशानभुमीत झुडुपे वाढलेली होती. याचा त्रास अंत्यविधीसाठी येणा-यांना होत होता. बऱ्याच दिवसापासून स्मशानभूमीत अस्वच्छता पसरली होती. या पार्श्वभूमीवर गावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा मानस गावकऱ्यांनी केला. ही बाब लक्षात घेवून शिक्षक दिनानिमित्त ग्रामदुत फाऊंडेशनचे प्रा.रत्नाकर चटप, प्रा.रुपेश विरुटकर, भास्कर लोहबडे, मुरलीधर बोडके, प्रमोद वाघाडे, प्रकाश महाराज उपरे, चंदू झुरमुरे, रवी चिंचोलकर, नितीन गिरटकर, रमेश गज्जलवार यांनी पुढाकार घेतला. स्वेच्छेने श्रमदानातून वाढलेली झुडपे तोडून स्मशानभुमीतील परिसर स्वच्छ करण्यात आला.

फाउंडेशनच्या माध्यमातून याआधी गावात वृक्षारोपण करण्यात आले होते. सोबतच राजूरा येथील विवेकानंद अनाथाश्रमात अनाथांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यापुढेही गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामविकासात योगदान दिले जाईल, असे ग्रामदुत फाऊंडेशनचे प्रकाश महाराज उपरे यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

Loksparsh Exclusive : त्या…नरभक्षक वाघाने घेतला तीन वर्ष्यात अकरा जनांचा बळी, मानवी जीवितास धोका ठरलेल्या वाघाला जेरबंद करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)यांचे आदेश,

कोरची ग्रामीण रुग्णालयात सदोष विद्युत जोडणीमुळे नेहमी होते राहते खंडीत,अतिआवश्यक वेळीच सुरू केले जाते जनरेटर!

अबब… केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला जीएसटी परताव्याचे तब्बल 25 हजार 334 कोटी रुपये येणे बाकी.. !

Comments are closed.